शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून संजय राऊत यांचं आव्हान काय? थेट म्हणाले, ‘… फरक पडत नाही’

| Updated on: Oct 02, 2023 | 1:37 PM

VIDEO | दसऱ्या मेळाव्यावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळत आहे. असे असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला चॅलेंज दिल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर तुम्ही कितीही आव्हानं द्या किंवा दिल्लीतून आर्मी बोलवा आम्हाला फरक पडत नाही. आमचा मेळावा शिवतीर्थावरच होणार असा निर्धारही व्यक्त केलाय.

Follow us on

मुंबई, २ ऑक्टोबर २०२३ | दसऱ्या मेळाव्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा व्हावा, यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटाकडून महिन्याभरापूर्वीच मुंबई महापालिकेला परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यामुळे कुणाला आता परवानगी मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले, ‘गेल्या ५० ते ५५ वर्षांपासून आम्ही शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर घेतोय. आता हे बेईमान लोकं यावर दावा सांगत आहे. मराठी माणसाची ताकद कमी करण्यासाठी षडयंत्र रचलं जात आहे. शिवसेनेच्या लोकांसमोर आव्हान उभं केलं जात आहे पण तुम्ही कितीही आव्हानं द्या किंवा दिल्लीतून आर्मी बोलवा आम्हाला काहीच फरक पडत नाही. दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आहे.’, असा निर्धार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.