‘फक्त सरकार येऊद्या 24 तासांत..., हे तिघेही शिवसेनेत दिसतील’, राऊत यांचा दावा

‘फक्त सरकार येऊद्या 24 तासांत…, हे तिघेही शिवसेनेत दिसतील’, राऊत यांचा दावा

| Updated on: Jun 19, 2023 | 9:30 AM

ज्यामुळं सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी पाकिस्तान तीन ‘ए’ चालवतात. अल्लाह, आर्मी आणि अमेरिका. आपला देश सुद्धा अशी तीन लोक चालवतात. सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग. मोदी वगैरे सर्व झूट आहे.

मुंबई : शिवसेना पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ठाकरे गटाच्या वरळीतील शिबिरात खासदार संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं. ज्यामुळं सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी पाकिस्तान तीन ‘ए’ चालवतात. अल्लाह, आर्मी आणि अमेरिका. आपला देश सुद्धा अशी तीन लोक चालवतात. सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग. मोदी वगैरे सर्व झूट आहे. उद्या आमच्या हातात सरकार येऊ द्या २४ तासांत मोदी, शाह, फडणवीस शिवसेनेत प्रवेश करतील. मग आम्ही सकाळी बातमी वाचणार… ईडीच्या भीतीने फडणवीसांचा शिवसेनेत प्रवेश असं राऊतांनी म्हटलं. याचबरोबर त्यांनी पुन्हा एकदा मोदी, शाह, फडणवीस यांची खिल्ली उडवताना, त्यांना घ्यायचं का नाही, हे उद्धव ठाकरे ठरवतील, असही म्हटलं आहे. तर यावेळी महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्र्यांचं फार पीक आलं आहे. पाहावे तिकडे, भावी मुख्यमंत्री. पण, आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत. जोपर्यंत आपली इच्छा आहे, तोपर्यंत राहू. हे राजकारण आहे. महाराष्ट्रात स्वबळावर भगवा झेंडा फडकवण्याची तयारी आम्ही करतोय. स्वबळावर 145 आमदार निवडून आणू. तसेच, मुंबई महापालिका आम्ही जिंकू, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

Published on: Jun 19, 2023 09:30 AM