राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊत स्पष्टच बोलले, ...शेवटी भावांचं नातं कायम

राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊत स्पष्टच बोलले, “…शेवटी भावांचं नातं कायम”

| Updated on: Jul 07, 2023 | 9:36 AM

मनसे नेते अभिजीत पानसे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबद्दल चर्चा रंगू लागली. दरम्यान या भेटीत नेमकं काय घडलं यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्यात सध्याच्या घडीला वेगवान घडामोडी सुरू आहेत. अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटातील आमदार अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. त्यानंतर आता ठाकरे बंधूं एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मनसे नेते अभिजीत पानसे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबद्दल चर्चा रंगू लागली. दरम्यान या भेट नेमकी कशासाठी झाली, याचं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं आहे. यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…

Published on: Jul 07, 2023 09:36 AM