‘राज यांच्या गाडीवर सुपारी फेकल्या…आमचा पक्ष म्हणून संबंध…’ काय म्हणाले राऊत
मनसेचे नेते राज ठाकरे यांनी शिवसेनेचा परंपरागत मतदार असलेल्या मराठवाड्याची आपल्या पहिल्या राजकीय दौऱ्यासाठी निवड केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मतदारांना आपल्याकडे खेचण्याची राज ठाकरे यांचा प्रयत्न दिसत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला मराठवाडा प्रचारदौरा सुरु केला आहे. विधान सभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपआपले दौरे सुरु केले आहेत. राज ठाकरे यांनी मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात एक वक्तव्य केले होते. त्यानंतर बीडमध्ये राज ठाकरे यांच्या कारवर सुपाऱ्या फेकण्यात आल्या. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या सुपाऱ्या फेकल्याचा आरोप केला जात आहे. या संदर्भात खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले की राज ठाकरे यांच्या कारवर सुपाऱ्या फेकण्यात आमच्या पक्षाचे कार्यकर्त्ये असू शकतील परंतू ते आंदोलन आमच्या शिवसेना पक्षाचे आंदोलन नाही. कदाचित आमची बीडमध्ये ताकद जास्त असल्याने या आंदोलनात शिवसेनेचे कार्यकर्ते देखील असतील,परंतू या आंदोलनात मुख्यत: मराठा आरक्षण आंदोलनाचे कार्यकर्ते होते. त्यात कदाचित मनसेचे देखील कार्यकर्ते असतील. कारण मराठा आरक्षण आंदोलन हे उत्स्फुर्त आंदोलन आहे. या आंदोलनात अनेक कार्यकर्ते हे राज ठाकरे यांनी मराठा आरक्षण आंदोलना संदर्भात केलेल्या वक्तव्याने नाराज झाले आहेत असेही संजय राऊत यांनी सांगितले.