महाराष्ट्रातील नेत्यांच्या दिल्लीत फेऱ्या का? संजय राऊत यांची राज्य सरकारवर टीका

“महाराष्ट्रातील नेत्यांच्या दिल्लीत फेऱ्या का?” संजय राऊत यांची राज्य सरकारवर टीका

| Updated on: Jul 13, 2023 | 12:32 PM

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा काही सूटेनासा झालाय. मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री अनेक वेळी दिल्लीला गेले. त्यांच्यानंतर काल अजित पवार सुद्धा अमित शाहा यांना भेटले. मात्र अद्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा काही सूटेनासा झालाय. मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री अनेक वेळी दिल्लीला गेले. त्यांच्यानंतर काल अजित पवार सुद्धा अमित शाहा यांना भेटले. मात्र अद्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, काँग्रेसचं राज्य असताना दिल्लीतील हायकमांडने आदेश दिल्यावर आम्ही टीका करायचो. मग आता काय बदल झाला? खातेवाटप, निधीवाटपासून मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत अनेक गोष्टींना एकेकाळच्या स्वाभिमानी नेत्याला दिल्लीत पायधूळ झाडावी लागते. पण, येथे आम्हाला ‘मातोश्री’वर भेट मिळाली नाही, शरद पवार भेटले नाहीत. आमचे ऐकून घेतलं जात नाही, अशी कारणं आपण ऐकत आहे. शपथ घेऊन दहा दिवस होत आले तरी राष्ट्रवादीतील फुटलेला गटाला खाते मिळाले नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी शपथ घेऊन एक वर्ष झाले तरी त्यांच्या इतर लोकांनी जे कोट शिवले त्यांची साईज बदलली शरीराचे साईज बदलली तरी विस्तारांची परवानगी मिळत नाही. मंत्रिपदाचा विस्तार करणे या घडीला म्हणजे दोन्ही गटातील असंतोष उडण्याचा भडका आहे.”

Published on: Jul 13, 2023 12:32 PM