शासन आपल्या दारी कार्यक्रमावर संजय राऊत म्हणतात; “पालकमंत्री कामात कमी पडतात…”
शनिवारी जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
नाशिक : शनिवारी जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, “त्या त्या भागातले आमदार, पालकमंत्री कमी पडत आहे म्हणून अशा प्रकारचे इव्हेंट्स तुम्हाला करावे लागतात. शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, महिला यांचे मत जाणून घ्या ते या सरकारवरती फार खुश नाही.पाच, दहा हजार लोक गोळा करण्यासाठी तुम्ही जी यंत्रणा राबवत आहे ती मनापासून नाही. मंत्रालयात बसून देखील राज्य चालवलं जातं.”
Published on: Jul 16, 2023 08:22 AM
Latest Videos