एकनाथ शिंदे लाचार… बाळासाहेब असते तर कडेलोट केलं असतं, संजय राऊत यांचा घणाघात
कोल्हापुरातील महाअधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार करत जोरदार प्रत्युत्तर दिलंय. दिल्लीच्या दरबारासमोर एकनाथ शिंदे लाचार झालेत. बाळासाहेब असते तर....
मुंबई, १९ फेब्रुवारी २०२४ : शिंदे गटाने शनिवारी कोल्हापुरातील महाअधिवेशनामध्ये भाजपच्या अभिनंदनाचा ठराव मांडला होता. यावरूनच ठाकरे गटाने शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय. तर कोल्हापुरातील महाअधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार करत जोरदार प्रत्युत्तर दिलंय. दिल्लीच्या दरबारासमोर एकनाथ शिंदे लाचार झालेत. बाळासाहेब असते तर कडेलोट केला असता, असे संजय राऊत म्हणाले. शिवसेनेच्या अधिवेशनात कोणकोणते ठराव मांडण्यात आले….चला जाणून घेऊ…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षांच्या १० वर्षांच्या कारकिर्दीसाठी अभिनंदनाचा ठराव, अमित शाह यांनी सहकार क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी अभिनंदनाचा ठराव, राममंदिर लोकार्पणाबद्दल मोदींच्या अभिनंदनाचा ठराव, लोकसभेच्या ४८ जागांवर विजयाच्या दृष्टीने सर्व निर्णय त्यासाठी लागणाऱ्या सर्व संसाधनांची व्यवस्था करण्यासाठी सर्वाधिकार तर मिशन ४८ शपथ आणि इतर…बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट