एक चुटकी की किंमत अन् दादा विरूद्ध दादा भिडले तर संजय राऊतांचे खोचक चिमटे

| Updated on: Jun 13, 2024 | 11:46 AM

बारामतीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी चुटकी वाजून दिलेलं आव्हान लोकसभा निवडणुकीभर गाजलं. त्यावरून अजित पवार यांनी नाराजी वर्तविली होती. त्याच चुटकीवरून संजय राऊत यांनी चिमटे काढत उत्तर दिलं आहे. मात्र निकालानंतर या विधानाचा फटका बसला असल्याची कबुली अजित पवार यांनी दिली.

Follow us on

एक चुटकी की किंमतच्या धर्तीवर राज्यात चंद्रकांत पाटील यांची चुटकी चर्चेचा विषय बनली आहे. बारामतीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी चुटकी वाजून दिलेलं आव्हान लोकसभा निवडणुकीभर गाजलं. त्यावरून अजित पवार यांनी नाराजी वर्तविली होती. त्याच चुटकीवरून संजय राऊत यांनी चिमटे काढत उत्तर दिलं आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात लोकसभेची लढत रंगली. त्यामुळे या लढतीला शरद पवार विरूद्ध अजित पवार अशी लढाई असूनही भाजपने आटोकाट प्रयत्न केले. फडणवीसांनी ही लढाई नणंद-भावजाय किंवा काका-पुतणे अशी नसून मोदी विरूद्ध गांधी अशी आहे. मात्र चंद्रकांत पाटलांनी चुटकी वाजवून शरद पवार यांचं राजकारण संपवण्याचं आव्हान दिलं होतं. मात्र निकालानंतर या विधानाचा फटका बसला असल्याची कबुली अजित पवार यांनी दिली. बघा स्पेशल रिपोर्ट…