Sanjay Raut : औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, ते स्मारक काढाल तर.. ; राऊतांचा घणाघात
MP Sanjay Raut On CM Devendra Fadnavis : औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना भाजपला पुन्हा एकदा डिवचलं आहे. फडणवीस यांनी कबर काढायला कुदळ फावडे घेऊन जावं असंही राऊत म्हणाले.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचे स्मारक आहे, असे आम्हाला वाटते. ते स्मारक काढायला जर कुणी निघाले असेल तर ते महाराष्ट्राचे क्षत्रू आहेत. तर या सरकारला तरुणांच्या भवितव्याची काही चिंता नाही, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी आज भाजप आणि महायुती सरकारवर केली आहे. सगळ्याच चर्चवरती, मशिदी वरती हतोडे घालता येणार नाहीत. आयोध्येचं राम मंदिर आमचं होतं. म्हणून आम्ही बाबरीवर हतोडा चालवला. पण आम्ही तेव्हाचं ठरवलं की यानंतर कोणत्याही मशिदीला आम्ही हात लावणार नाही, ही आमची भूमिका होती, असंही यावेळी राऊत म्हणाले.
यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, कारसेवाच्यावेळी देवेंद्र फडणवीस हे गेले होते तेव्हाचा त्यांचा फोटो मी पहिला आहे. मग आता सुद्धा त्यांनी वर्षा बंगल्यातून डोक्याला रुमाल बांधून, हातात फावडा आणि कुदळ घेऊन औरंगजेबाची कबर उखडून काढायला जावं. औरंगजेबाच्या कबरीबद्दलची पत्रबाजीची नाटकं बंद करा. राज्य तुमचं, पोलीस तुमचे, कुदळ फावडे तुमचे, जा आणि काय तो निर्णय घ्या, असंही राऊत यांनी म्हंटलं आहे.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?

नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'

औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?

नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
