Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

...याचाच अर्थ तुम्ही  शुद्ध भावनेने माफी मागितली नाही...तुमच्या मनात...काय म्हणाले राऊत

…याचाच अर्थ तुम्ही शुद्ध भावनेने माफी मागितली नाही…तुमच्या मनात…काय म्हणाले राऊत

| Updated on: Aug 31, 2024 | 5:31 PM

संजय राऊत यांनी मोदींवर टिका करीत उद्या महाविकास आघाडी काही झाले तरी मुंबईत 'जोडो मारो' आंदोलन करणारच असा इशारा दिला आहे.

शिवाजी महाराज्याच्या अपमानानंतर महाराष्ट्र जर उसळणार  नसेल तर महाराजांचे नाव सांगण्याचा महाराष्ट्राला अधिकार नाही असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेनेने जोडो मारो आंदोलन मागे केले होते. तेव्हा गृहमंत्री राष्ट्रवादीचे होते, आणि मुख्यमंत्री कॉंग्रेसचे होते. तरी आम्हाला विरोधी पक्ष म्हणून ‘जोडेमोरो आंदोलन’ करु दिले होते हे लक्षात घ्या मिस्टर मोदी..मि. फडणवीस असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. आता या प्रकरणात उद्या आम्ही हुतात्मा चौकात जमणार आहोत आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन पुकारणार आहोत. तुम्ही आम्हाला अटक करा अथवा करु नका आम्ही आंदोलन करणार असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुळात सावरकर आणि शिवाजी महाराज यांचा विषयच वेगळा आहे. तुम्ही येथे सावकरांची तुलना शिवरायांशी करताय म्हणजेच तुमच्या मनात पाप आहे. जर सावकरांबद्दल इतके ममत्व असेल तर द्याना त्यांना ‘भारत रत्न पुरस्कार’ असेही राऊत यांनी म्हटले आहे.

 

Published on: Aug 31, 2024 05:30 PM