जाहिरातीवरून शिंदे गटाला राऊत यांनी पुन्हा फटकारलं; म्हणाले, डोकं ठिकाणावर

जाहिरातीवरून शिंदे गटाला राऊत यांनी पुन्हा फटकारलं; म्हणाले, “डोकं ठिकाणावर”

| Updated on: Jun 14, 2023 | 11:52 AM

या जाहिरातीत ‘देशात मोदी अन् राज्यात शिंदे’ असा नारा देण्यात आला आहे. तर शिंदे यांना फडणवीस यांच्या पेक्षा अधिक पंसती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. यावरून टीका झाल्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी त्या जाहिरातीचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या हितचिंतकांनी ही जाहिरात दिली असावी, असं स्पष्टीकरण देसाई यांनी दिलं.

मुंबई : राज्यातील प्रमुख वृत्तपत्रात शिवसेना शिंदे गटाची जाहिरात प्रसिद्ध झाली. ज्यावरून राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे विरोधकांच्या रडावर आले. या जाहिरातीत ‘देशात मोदी अन् राज्यात शिंदे’ असा नारा देण्यात आला आहे. तर शिंदे यांना फडणवीस यांच्या पेक्षा अधिक पंसती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. यावरून टीका झाल्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी त्या जाहिरातीचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या हितचिंतकांनी ही जाहिरात दिली असावी, असं स्पष्टीकरण देसाई यांनी दिलं. त्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला फटकारलं आहे. त्यांनी हितचिंतक अशी जाहिरीत देत नाही, शत्रूच देतो असा घणाघात केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहिरात आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरेंचा विसर यांना पडतो. असा विसरणारा हितचिंतक त्याचाकडं कोण आहे असा सवाल त्यांनी केला आहे. तर अशा विसरणाऱ्या हितचिंतकांच्या ताकीवर तुम्ही राज्य करता. त्यामुळं जरा डोक ठिकाणावर ठेऊन बोला असा खोचक सल्ला दिला आहे.

Published on: Jun 14, 2023 11:52 AM