भाजपनं पैसे फुकट घालवू नयेः संजय राऊत
खासदार संजय राऊत यांनी मतं मिळविण्यासाठी उगाच भाजपनं पैसे फुकट घालवू नये आणि नाही ती चटक लावू नये असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. राज्यातील राजकारणात नको ते पायंडे भाजपने पाडू नये असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
राज्यसभेच्या निवडणुकीबाबत आता महाविकास आघाडी आणि भाजपकडून जोरदारपणे फिल्डींग लावण्यात येत आहे. राज्यसभेच्या उमेदवार आणि मतदानाविषयी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, भाजपचं एकही मत फुटणार नाही, कारण जे मतदार महाविकास आघाडीकडे कंटाळले होते, तेच आमच्याकडे आले आहेत, त्यामुळे भाजपचं एकही मत फुटणार नाही असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे, तर खासदार संजय राऊत यांनी मतं मिळविण्यासाठी उगाच भाजपनं पैसे फुकट घालवू नये आणि नाही ती चटक लावू नये असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. राज्यातील राजकारणात नको ते पायंडे भाजपने पाडू नये असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
Published on: Jun 04, 2022 08:24 PM
Latest Videos