संजय राऊत अडचणीत? ‘ते’ प्रकरण गेलं हक्कभंग समितीकडे, ‘या’ नेत्याने दिली माहिती …
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.संजय राऊत यांच्या हक्कभंगाचे प्रकरण राज्यसभेच्या विशेषाधिकार समितीकडे सूपुर्द करण्यात आलं आहे. सभापती घनखड यांनी हक्कभंगाचे प्रकरण समितीकडे पाठवले.
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊत नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आमदारांनी बंड केल्यानंतर संजय राऊत अधिक आक्रमक होताना दिसले. अनेक वेळा त्यानी शिवराळ भाषा वापरत शिंदे-भाजप सरकारवर टीका केली. आता हेच संजय राऊत यांना महागात पडणार आहे. संजय राऊत यांच्या हक्कभंगाचे प्रकरण राज्यसभेच्या विशेषाधिकार समितीकडे सूपुर्द करण्यात आलं आहे. सभापती घनखड यांनी हक्कभंगाचे प्रकरण समितीकडे पाठवले.दरम्यान संजय राऊत यांच्याविरोधात 2 वेगळे हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आल्याचे हक्कभंग समितीचे अध्यक्ष राहुल कुल यांनी सांगितले. हक्कभंग प्रस्तावावर सुरुवातीला राज्यसभा निर्णय घेणार. राज्यसभेच्या निर्णयानंतर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील, असं देखील राहुल कुल यांनी म्हटलं आहे.
Published on: May 18, 2023 02:41 PM
Latest Videos