video : शिंदे-फडणवीस सराकर व्हेंटिलेटरवर, 16 आमदार अपात्र ठरणार
नाशिक दौऱ्यात राऊत यांनी, शिंदे सरकार सध्या व्हेंटिलेटरवर आहे. सुप्रीम कोर्टाने हे व्हेंटिलेटर काढलं की सरकारचं राम नाम सत्य है… असं वक्तव्य राऊत यांनी केलं.
नाशिक : ठाकरे गटाला शह देण्याासाठी शिंदे गटाने नाशिकवर लक्ष केंद्रीत केलं आणि तेथे भगदाड पाडण्यात यशस्वी झाले. यानंतर होणारे डॅमेज आणि उद्धव ठाकरे यांची नियोजित सभेच्या तयारिसाठी खासदार संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. तसेच हे सरकार आता अधिक काळ राहणार नसल्याचे म्हटलं आहे.
नाशिक दौऱ्यात राऊत यांनी, शिंदे सरकार सध्या व्हेंटिलेटरवर आहे. सुप्रीम कोर्टाने हे व्हेंटिलेटर काढलं की सरकारचं राम नाम सत्य है… असं वक्तव्य राऊत यांनी केलं.
तर हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, हे वक्तव्य मी करतोय, त्यावर अजूनही ठाम असल्याचेही राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांविरोधात अपात्रतेचा खटला कोर्टात सुरु आहे. न्यायव्यवस्थेतवर कोणताही दबाव आला नाही तर निकालात काय होईल हे सांगण्याची गरज नाही. तसेच कोर्टात निकाल आमच्या बाजूने लागणार आणि न्यायालयात आम्हालात न्याय मिळणार, हे निश्चित आहे