आता निवडणूक आयोग अशोक चव्हाण यांना काँग्रेसचा ताबा देणार काय? संजय राऊत यांचा सवाल

| Updated on: Feb 12, 2024 | 3:32 PM

आमदारकीचा राजीनामा अशोक चव्हाण यांनी दिल्यानंतर काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली. या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळातून सत्ताधारी विरोधकांकडून प्रतिक्रिया येत असताना अशोक चव्हाण भाजपवासी झाले, विश्वास बसत नाही, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.

Follow us on

मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४ : काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला. आमदारकीचा राजीनामा अशोक चव्हाण यांनी दिल्यानंतर काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली. या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळातून सत्ताधारी विरोधकांकडून प्रतिक्रिया येत असताना अशोक चव्हाण भाजपवासी झाले, विश्वास बसत नाही, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. तर कालपर्यंत अशोक चव्हाण सोबत होते.. चर्चा करीत होते.. आज गेले…अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट करत खोचक टोला लगावला आहे. तर पुढे ते असेही म्हणाले, एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकते!, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.