‘मी विधिमंडळास चोरमंडळ म्हटले नसून…’, संजय राऊत यांचं हक्कभंग नोटीसला उत्तर
VIDEO | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं हक्कभंग नोटीसला उत्तर, नेमकं काय म्हणाले बघा सविस्तर
मुंबई : विधिमंडळ नव्हे हे चोरमंडळ या वक्तव्यावरून संजय राऊत यांना हक्क भंगाची नोटीस बजावण्यात आली होती. १ मार्च रोजी कोल्हापुरात संजय राऊत यांनीही वक्तव्य केलं होतं. यावरून हक्कभंग समितीतर्फे राऊत यांना ही नोटीस पाठवण्यात आली होती. याच नोटीसला राऊत यांनी उत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केल्यानंतर भाजपसह शिंदे गटाच्या काही सदस्यांनी संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली होती. यानंतर शिंदे फडणवीस सरकारकडून राऊत यांच्यावर कारवाई करण्यासाठी हक्क भंग समिती स्थापन केली होती. या सर्व घडामोडीनंतर संजय राऊत यांनी हक्कभंग नोटीसला उत्तर दिलं आहे. त्यांनी विधिमंडळ प्रधान सचिवांना एक पत्र लिहून हक्कभंग समितीतील सदस्यांवरच आक्षेप घेतला आहे. इतकेच नाही तर विधिमंडळाची अप्रतिष्ठी होईल, असे कोणतेच विधान मी केले नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.