आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा सर्वात मोठा पराभव ‘येथे’ होणार? संजय राऊत यांनी केला दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एनडीएची बैठक घेणार असून ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यावरून राऊत यांनी सडकून टीका करताना हा दावा केलाय.
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2023 । ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज आगामी लोकसभा निवडणुकीवरून भाजपचा पराभव होईल असा दावा केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे सध्या अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एनडीएची बैठक घेणार असून ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यावरून राऊत यांनी सडकून टीका करताना हा दावा केलाय. यावेळी राऊत यांनी, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला झटका बसेल. तर महाराष्ट्रातच भाजपचा सगळ्यात मोठा पराभव होईल असा दावा केला. यावेळी राऊत यांनी, सध्या भाजपच चिंचेत आहे. येत्या निवडणुकीत काय पोईल याची चिंता भाजपला लागलेली आहे. तर त्यांनी काय होईल याचा विश्वास देखील राहिलेला नाही. त्यामुलेच भाजपकडून विरोधकांच्या पक्षात तोडातोडी आणि फोडाफोडी केली जातेय. त्यामुळे आता भाजपने कितीही प्रयत्न केले तरी त्यांचा महाराष्ट्रात सर्वात मोठा पराभव हा होणारच. जो ऐतिहासिक असले असे म्हटलं आहे.