Special report | संस्थांमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र? राऊत यांचा रोखठोक मधून नवा दावा

Special report | संस्थांमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र? राऊत यांचा रोखठोक मधून नवा दावा

| Updated on: Aug 21, 2023 | 9:22 AM

शरद पवार आणि अजित पवार यांच्यात राजकीय मतभेद झाले आणि राष्ट्रवादी फुटली. त्यातून शरद पवार आणि अजित पवार असे गट तयार झाले. मात्र अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बैठका होत आहेत. यावरून सध्या अनेक चर्चा होत आहेत.

मुंबई : 20 ऑगस्ट 2023 | शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गेल्या दिड एक महिन्यात जवजवळ तीन भेटी झाल्या आहेत. तर एक गुप्त बैठक पार पडली. यातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच शरद पवार यांना ऑफर दिली व ती घेऊन अजित पवार भेटले अशी चर्चा सुरू होती. त्याचदरम्यान ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या बैठकीवरून दावा केला आणि नवा वाद देखील सुरू झाला आहे. अजित पवार आणि शरद पवारांच्या गुप्त बैठकीवर संजय राऊतांनी रोखठोकमधून हा दावा केलाय. त्यामुळे याची चर्चा होऊ लागली आहे. तर राऊत यांनी, झालेली गुप्त बैठक ही राजकीय नव्हती. तर ज्या संस्थांमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र संचालक आहेत. त्या संस्थांच्या भवितव्याबद्दल होती. अशा कोणत्या संस्था आहेत? आणि राऊत नेमकं काय सुचवू पाहताय? त्यावर हा स्पेशल रिपोर्ट

Published on: Aug 21, 2023 09:22 AM