‘हे कौतुक 2024 नंतरही कायम ठेवा’; राऊत यांचा शाह यांना टोला

‘हे कौतुक 2024 नंतरही कायम ठेवा’; राऊत यांचा शाह यांना टोला

| Updated on: Aug 07, 2023 | 10:56 AM

यावेळी व्यासपीठावरच शाह यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतूक झाले. तर शाह यांनी, 'अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच आपण एकत्र आलो. पण आता तुम्ही योग्य जागेवर आहात. पण इथे पोहोचायला तुम्ही उशीर केलात' असं म्हटलं होतं.

मुंबई, 7 ऑगस्ट 2023 | केंद्रीय गृहमंत्री, सहकार मंत्री अमित शाह यांचा काल पुण्यात कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावरच शाह यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतूक झाले. तर शाह यांनी, ‘अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच आपण एकत्र आलो. पण आता तुम्ही योग्य जागेवर आहात. पण इथे पोहोचायला तुम्ही उशीर केलात’ असं म्हटलं होतं. त्यावरून आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शाह यांना टोला लगावला आहे. त्यांनी पवार यांच्याबाबत हेच कौतूक 2024 नंतरही कायम ठेवा असं म्हणत टोला लगावला आहे. तर दादा योग्य जागेवर या वक्तव्यावरून निशाना साधताना दादा नक्की कुठे आहेत? असा सवाल देखील केला आहे. तर सध्या योग्य आणि अयोग्य याच्या व्याख्या करता येणार नाहीत. तर त्या कोणी ठरवूही नये असे देखील त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Aug 07, 2023 10:56 AM