नीलम गोऱ्हे यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर राऊत खवळले; थेटच म्हणाले, ‘श्रद्धांजली वाहतो’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटामध्ये हा प्रवेश केला. तसेच त्यांनी प्रवेश करताना ठाकरे गटातील काही नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाना साधला. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गोऱ्हे यांचा समाचार घेतला.
पंढरपूर : शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या, उपनेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश करत उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांना धक्का दिला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटामध्ये हा प्रवेश केला. तसेच त्यांनी प्रवेश करताना ठाकरे गटातील काही नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाना साधला. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गोऱ्हे यांचा समाचार घेतला. राऊत यांनी गोऱ्हे यांच्यावर टीका करताना , ‘नीलम गोऱ्हे यांना 5 वेळा आमदार केले. त्यांना वैधानिक पद दिलं. मात्र 4 ते 5 महिन्यांसाठी असणारं पद वाचवण्यासाठी त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. यामुळे त्यांची लाज अख्या महाराष्ट्राला वाटते. अशा लोकांना आम्ही श्रद्धांजली वाहतो अशी टीका राऊत यांनी केली आहे.
Published on: Jul 08, 2023 01:43 PM
Latest Videos