‘सदोष मनुष्यवधाचे गुन्हे फडणवीस आपल्यावर दाखल करून घेणार का?’ संजय राऊत यांचा सवाल
मृतकांच्या कुटूंबांना 5 लाख आर्थिक मदत राज्य शासनाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जखमींचा उपचार शासनाकडून केला जाईल असे सांगितलं होते. तर या अपघातप्रकरणी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केल्याची माहिती देताना याची सखोल चौकशी केली जाईल असेही म्हटलं होतं.
मुंबई : समृद्धी महामार्गावरील बुलढाण्यात खासगी बसचा झालेल्या अपघात हा भीषण होता. त्यात 26 जणांचा मृत्यू झाला. तर काही प्रवाशी जखमी झाले. यानंतर मृतकांच्या कुटूंबांना 5 लाख आर्थिक मदत राज्य शासनाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जखमींचा उपचार शासनाकडून केला जाईल असे सांगितलं होते. तर या अपघातप्रकरणी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केल्याची माहिती देताना याची सखोल चौकशी केली जाईल असेही म्हटलं होतं. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, फडणवीस यांच्यावर टीका करताना सरकारवर देखील निशाना साधला आहे. त्यांनी यावेळी या महामार्गावरून शिवसेनेने कधीही राजकारण केलं नाही. पण महामार्गाची रितसर तांत्रिक पडताळणी व्हायला हवी. अपगात का होत आहेत हे ही तपासायला हवं असेही ते म्हणाले. तर या भीषण अपघातामुळे चालकावर गुन्हा दाखल केला. मात्र 300 हून अधिक अपघात आणि 100 हून अधिक जणांचा बळी येथे गेला आहे. त्याप्रकरणी आता फडणवीस आपल्यावरच सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून घेणाक का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.