‘2019मध्ये ठाकरे एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करणार होते, पण भाजपने…’; राऊत यांचा रोखठोकमधून मोठा दावा
तर भाजपने दिलेला शब्द पाळला नाही, त्यांनीच युती तोडली असं ठाकरे गटाकडून स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे. याचदरम्यान आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि शिवसेना-भाजप युतीवरून कलगीतुरा रंगलेला आहे.
मुंबई, 13 ऑगस्ट 2023 | शिवसेना आणि भाजप युती तुटल्यापासून ती उद्धव ठाकरे यांनी तोडली असे भाजपकडून वारंवार सांगण्यात येत आहे. तर भाजपने दिलेला शब्द पाळला नाही, त्यांनीच युती तोडली असं ठाकरे गटाकडून स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे. याचदरम्यान आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि शिवसेना-भाजप युतीवरून कलगीतुरा रंगलेला आहे. तर याच मुद्द्यावरून दैनिक सामनाच्या रोखठोकमधून मोदी कुणाला चुकीची माहिती देत आहेत? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर 2019मध्ये एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून युती तोडत असल्याचं म्हटलं होतं. हेच कदाचित मोदी विसरत आहेत का असा सवाल देखील केला आहे. तर 2019मध्ये उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करणार होते. परंतु भाजपला ते मुख्यमंत्री म्हणून नको होते असा दावा देखील राऊत यांनी केलाय. तर केवळ अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावरून युती तुटली नाही तर शिंदे यांना विरोध होता अशी माहिती आता राऊत यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.