संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई होणार? विधानभवनात महत्वपूर्ण बैठक

संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई होणार? विधानभवनात महत्वपूर्ण बैठक

| Updated on: Mar 08, 2023 | 11:39 AM

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला. विधानभवनातच या संदर्भातील बैठक होणार आहे. काय कारवाई करायची याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी हा हक्कभंग प्रसाव मांडला. यावर आता लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. उद्या 9 तारखेला याबाबत हक्कभंग समितीची चार वाजता बैठक होणार आहे. विधिमंडळाबाबत संजय राऊत यांनी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे हक्कभंगाचा प्रस्ताव बुधवारी 1 मार्चला दाखल केला होता. त्यानंतर राऊतांना हक्कभंगाची नोटीस बजावून 48 तासांत लेखी म्हणणे मांडण्यासंदर्भात सांगितलं होतं. पण अद्यापही संजय राऊतांनी हक्कभंगाच्या नोटीसला उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे राऊतांच्या अडचणीत वाढ होणार की ते वेळ वाढवून मागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.