शिवसेनेतील सर्वात मोठा ‘व्हिलन’ म्हणत संजय राऊत यांच्यावर कुणी केली विखारी टीका ?
धनुष्यबाण आम्हाला मिळणार नाही. शिवसेना मिळणार नाही. भाजपमध्ये विलीन व्हावे लागेल. खोटे बोलून काही जणांना थांबवले होते. पण, आता कुणी तिथे थांबणार नाही.
खेड : उद्धव ठाकरे यांच्याकडील ५ आमदार आणि २ खासदार आमच्यासोबत आहेत. ही संख्या आणखी वाढणार आहे. काही जण सांगत होते की धनुष्यबाण आम्हाला मिळणार नाही. शिवसेना मिळणार नाही. भाजपमध्ये विलीन व्हावे लागेल. खोटे बोलून काही जणांना थांबवले होते. पण, आता कुणी तिथे थांबणार नाही. खेडमध्ये संजय कदम यांनी आता ‘त्या’ पक्षात प्रवेश केला तरी २०२४ नव्हे तर त्यानंतरही भविष्यात त्यांना आमदार म्हणून कधी विधानभवन पहायला मिळणार नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे धनुष्यबाण विकले. आता ते तुम्हाला हातात घेण्याचा आणि काहीही बोलण्याचा अधिकार नाही. शिवसेनेत सर्वात जास्त मोठे व्हिलन कोण असेल तर ते संजय राऊत आहे, अशी टीका खेडचे आमदार योगेश कदम यांनी केली.
Published on: Feb 19, 2023 04:32 PM
Latest Videos