Video : अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील? संजय राऊत म्हणाले…

| Updated on: Jul 26, 2022 | 11:19 AM

अर्जून खोतकर शिंदे गटात सामील? संजय राऊत काय म्हणाले?

Video : अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील? संजय राऊत म्हणाले...
sanjay raut
Follow us on

“दोन दिवसांपूर्वीच माझं अर्जुन खोतकर यांच्याशी बोलणं झालं. यावेळी त्यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यावर टीका केली होती. दानवेंना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं ते म्हणाले होते. दानवेंबाबत त्यांनी आणखी काही शब्द वापरले होते. ते मी तुम्हाला सांगू शकत नाही, असं सांगतानाच जोपर्यंत खोतकर स्वत:हून सांगत नाहीत. तोपर्यंत ते शिवसेनेतच आहेत. त्यांनीच याबाबत बोललं पाहिजे”, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलंय.  शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) हे शिंदे गटात जाण्याची चर्चा सध्या सुरु आहे. खोतकर शिंदे गटात गेल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.