पोपटलालची पोपटपंची आम्ही लवकरच बंद करणार!; संजय राऊतांचा ‘या’ भाजप नेत्याला इशारा
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. तसंच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरही टीका केली आहे. पाहा व्हीडिओ...
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. तसंच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरही टीका केली आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांचा ‘पोपटलाल’ असा उल्लेख केलाय. कधी संजय राऊत, कधी अनिल परब, तर कधी किशोरी पेडणेकर यांना घेरण्याचा प्रयत्न होतो. पण आम्ही या सगळ्याला घाबरणारे नाही. लवकरच या पोपटलालची पोपटपंची आम्ही लवकरच बंद करणार आहोत, असं संजय राऊत म्हणालेत.
Published on: Feb 01, 2023 11:24 AM
Latest Videos