“सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री,” बावनकुळेंच्या दाव्यावर राऊत म्हणतात…
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठा दावा केला आहे. ठाकरे सुप्रियांना मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करणार होते, असा दावा त्यांना केला. बावनकुळेंच्या दाव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "चंद्रशेखर बावनकुळे यांना राजकारण माहित नाही, त्यांना गांभीर्याने घेऊ नये", असं राऊत म्हणाले.
मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अलिखित करार झाला होता, असं बावनकुळे म्हणाले. 2019 ते 2024 उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री. राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि नेत्यांनी मिळून शिवसेना कमी करायची, शिवसेनेचे आमदार कमी करायचे, अशी छुपी युती आणि सहमती उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला दिली होती. राष्ट्रवादीचे 100 आमदार करायचे आणि आपले आमदार कमी करायचे. 2024 मध्ये सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आणि आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री करायचं, हा अजेंडा ठरला होता,’ असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. या दाव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “चंद्रशेखर बावनकुळे यांना राजकारण माहित नाही, त्यांना गांभीर्याने घेऊ नये”, असं राऊत म्हणाले.