“मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या आत्महत्येच्या दाव्यावर केसरकर यांची चौकशी करा”, संजय राऊत यांची मागणी
शिवसेनेच्या आमदारांनी केलेला उठाव यशस्वी झाला नसता, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेव्हा डोक्यावर गोळी झाडून घेतली असती, असा खळबळजनक दावा केला. त्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. केसरकर यांच्या दाव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई : शिवसेनेच्या आमदारांनी केलेला उठाव यशस्वी झाला नसता, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेव्हा डोक्यावर गोळी झाडून घेतली असती, असा खळबळजनक दावा केला. त्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
केसरकर यांच्या दाव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आत्महत्येचा विचार येणाऱ्या मुख्यमंत्रीपदावर व्यक्ती बसली असेल तर राज्यासाठी असं मानसिक स्वास्थ योग्य नसलेल्या व्यक्तीच्या हातात राज्य आहे. हे त्यांचे मंत्री सांगत आहेत. ज्या राज्याच्या हातात मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आहेत. त्यांच्या मनात जर आत्महत्येचे विचार येत असतील तर असं मनस्वास्थ बिघडलेली व्यक्ती या राज्याचं नेतृत्व कसं काय करू शकते? त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांच्यावर ही जबाबदारी आहे आणि मुख्य म्हणजे दीपक केसरकरांची चौकशी व्हायला हवी. त्यांनी हे रहस्य इतके दिवस का लपवलं? याबाबत त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे,” असं संजय राऊत म्हणाले.