“दादा भुसे, राधाकृष्ण विखे पाटलांचा कधीपर्यंत बचाव करणार?”, संजय राऊत यांचा संतप्त सवाल
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचे नेते दादा भुसे, भीजपचे नेते राहुल कुल आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "तामिळनाडू, दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रात धाडी टाकून मंत्र्यांना अटक केली जातेय. पुढच्या दोन दिवसात दादा भूसे यांच्याविषयी ईडीकडे तक्रार करणार आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचे नेते दादा भुसे, भाजपचे नेते राहुल कुल आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “तामिळनाडू, दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रात धाडी टाकून मंत्र्यांना अटक केली जातेय. पुढच्या दोन दिवसात दादा भूसे यांच्याविषयी ईडीकडे तक्रार करणार आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टात जाणार. याआधी मुख्यमंत्री आणि सीबीआयकडे तक्रार करून झालेली आहे. 178 कोटी रुपये शेतकऱ्यांचे जमा केले. ते आहेत कुठे? गिरणा सहकारी साखर कारखाना बसवण्यासाठी हे पैसे गोळा केले. या पैशांचे मनी लाँड्रिंग झाले आहे. तसेच दादा भुसे यांचे प्रकरण हे सीबीआय अंतर्गत येत नाही, असे सांगण्यात आल्याने याची तक्रार ईडीकडे करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा उजवा हात असणारे राहुल कुल यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. तसेच, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबाबत आणखी माहिती ही ईडीला देणार आहे. तर झाकीर नाईक ज्याच्यावर देशद्रोहाचा आरोप आहे, त्याच्याकडून विखेंच्या संस्थेला 4 ते 5 कोटी देण्यात आले आहेत, त्याकरिता या प्रकरणी एनआयएने गुन्हा दाखल केला पाहिजे. , झाकिर नाईक संदर्भात तुम्ही लोकांना अटक करत आहात, मग राधाकृष्ण विखे-पाटील का सुटत आहेत? त्यांच्या कारखान्याची प्रकरण ही अत्यंत भयानक आहेत, लवकरच ते मी एक्सपोझ करेन, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.