देवेंद्र फडणवीस यांच्यावर गद्दारांची गाडी चालवण्याची वेळी; संजय राऊत यांचा खोचक टोला
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर गद्दारांची गाडी चालवण्याची वेळ आली आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर गद्दारांची गाडी चालवण्याची वेळ आली आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. नव्या संसदभवनाच्या उद्घाटनावरून टीकास्त्र डागलंय.”नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला आमचा विरोध नाही. मात्र त्या उद्घाटनात देशाच्या राष्ट्रपतींना सामावून घेतलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदावर बसवलं असं तुम्ही म्हणता. मग तो त्यांचा अधिकार आहे, असं राऊत म्हणाले. तसेच “बाळासाहेबांनी कधीच कोणत्या व्यक्तीला विरोध केला नाही. फडणवीसंकडून आम्हाला बाळासाहेब शिकण्याची वाईट वेळ आलेली नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाविषयी बोलावे. बाळासाहेबांनी कधी गद्दारांना मांडीवर घेतलं नव्हतं. गद्दारांना लाथा मारून हाकलून द्या असं सांगितलं होतं. फडणवीस गद्दाराच्या गाड्या चालवतायत”.