“उद्धव ठाकरे यांचा बाण आरपार घुसला, ही मिरच्यांची धुरी”; संजय राऊत यांचा फडणवीस यांच्यावर हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना नागपूरचा कलंक म्हटलं होतं. यावरून फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना मानसोपचाराची गरज असल्याचं म्हटलं आहे. भाजपच्या नेत्यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना पलटवार केला आहे.
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कलंक या शब्दावरून चांगलीच जुंपली आहे. उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना नागपूरचा कलंक म्हटलं होतं. यावरून फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना मानसोपचाराची गरज असल्याचं म्हटलं आहे. भाजपच्या नेत्यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना पलटवार केला आहे. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी सोडलेला बाण आरपार घुसला आहे.मिरच्या आरपार घुसल्या. ही मिरच्यांची धुरी आहे. वर्षभरापासून ज्यांनी महाराष्ट्र कलंकित केला त्या कलंक शब्दावर बंदी आहे का? फडणवीस यांना लवकर मिरच्या झोंबतात. हे त्यांचं फ्रस्टेशन आहे. ते उफाळून येत आहे. चक्की पिसिंग म्हणत होता त्यांच्या बाजूला बसता? आज हसन मुश्रीफ तुमचे सहकारी आहेत. हा महाराष्ट्राला कलंकित करण्याचा प्रकार आहे की नाही सांगा? आम्ही प्रश्न विचारतो तेव्हा ते उसळतात, चिडतात आणि त्यांचा उद्रेक होतो. त्यामुळे ते अशी वेडीवाकडी विधानं करणारच.”