कितीही बुडबुडे सोडले, तरी शिंदेंची शिवसेना अपात्रच होणार, संजय राऊत यांचा दावा...

“कितीही बुडबुडे सोडले, तरी शिंदेंची शिवसेना अपात्रच होणार”, संजय राऊत यांचा दावा…

| Updated on: May 31, 2023 | 3:15 PM

मंत्रिमंडळ विस्तारावरून संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे."मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मला माहित नाही, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे चेहरे बघा. त्यांना झोपचं लागत नाही, यांची झोप उडाली आहे.

नवी दिल्ली : मंत्रिमंडळ विस्तारावरून संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.”मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मला माहित नाही, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे चेहरे बघा. त्यांना झोपचं लागत नाही, यांची झोप उडाली आहे. हे लोकं तळमळत असतात, तडफडत असतात. देवेंद्र फडणवीस यांनी प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे, मला त्यांची काळजी वाटते.पण या सरकारवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यात कितीही पळ काढला तरी विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मान्य करावा लागेल. कितीही बुडबुडे सोडले तरी शिंदे गट अपात्रच होणार, असं संजय राऊत म्हणाले.

Published on: May 31, 2023 03:15 PM