देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया; म्हणाले मलाही…
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray Meeting : देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधिमंडळ अधिवेशनादरम्यान भेट झाली. या भेटीवर ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...
मुंबई : विधिमंडळ अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. या भेटीवर शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची अधिवेशनावेळी भेट झाली. त्यात काही वेगळं नाही. विधिमंडळात जाण्याचा मार्ग एकच आहे. त्यामुळे त्यांची भेट झाली. माझीही पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी. नडा ही मंडळी भेटत असतात. त्यात वावगं काही नाही. भविष्यात आम्ही अजिबात एकत्र येणार नाही, असंही संजय राऊत म्हणालेत. ते माध्यमांशी बोलत होते.
Published on: Mar 27, 2023 12:13 PM
Latest Videos