दोन मतांसाठी गिरीश बापट यांना अमानुषपणे निवडणुकीच्या प्रचारात उतरवलं; संजय राऊत यांचा भाजपवर थेट निशाणा
कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीची आज मतमोजणी होतेय. यावर शिवसेना ठाकरेगटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोल्हापूर : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीची आज मतमोजणी होतेय. याता कसब्यात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर आघाडीवर आहेत. तर पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर आहेत. या मतमोजणीवर वर शिवसेना ठाकरेगटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन मतांसाठी गिरीश बापट यांना निवडणुकीच्या प्रचारात उतरवलं, हे अमानुष आहे, असं राऊत म्हणालेत. शिवाय इथून पाठीमागे कसब्यात भाजप शिवसेनेच्या पाठिंब्यावरच निवडून येत होतं, असंही संजय राऊत म्हणालेत.
Published on: Mar 02, 2023 10:59 AM
Latest Videos