Video : कुणाला भेटायचंय त्यांना भेटा, धमक्या देऊ नका- संजय राऊत
हनुमान चालिसा (hanuman chalisa) म्हणायला महाराष्ट्रात विरोध आहे का? देशात कुठेच विरोध नाही. काल ते जेलमध्ये होते. तिथे वाचू शकतात हनुमान चालिसा. त्यांना ऑर्थररोड आणि भायखळा तुरुंगात नेणार आहेत. तिथे जाऊन त्यांनी हनुमान चालिसा वाचावं. त्यांनी फडणवीसांच्या घरात जाऊन वाचावं. एखादं मोठं सभागृह घ्यावं तिथे वाचावं, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी लगावला. […]
हनुमान चालिसा (hanuman chalisa) म्हणायला महाराष्ट्रात विरोध आहे का? देशात कुठेच विरोध नाही. काल ते जेलमध्ये होते. तिथे वाचू शकतात हनुमान चालिसा. त्यांना ऑर्थररोड आणि भायखळा तुरुंगात नेणार आहेत. तिथे जाऊन त्यांनी हनुमान चालिसा वाचावं. त्यांनी फडणवीसांच्या घरात जाऊन वाचावं. एखादं मोठं सभागृह घ्यावं तिथे वाचावं, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी लगावला. महाराष्ट्रात (maharashtra) धार्मिक कार्यक्रमाला कुणीच विरोध केला नाही. पण त्यांचा हट्ट आहे. आम्ही मातोश्रीत घुसून वाचू… घुसून वाचू. मग आम्हीही घुसू. हे काय तुमच्या बापाचं राज्य आहे का? घुसून वाचेल काय? वाचा ना. तुम्ही तुमच्या घरात आणि मंदिरात पठण करा. इतर धर्मीयही करतात. पण तुमचा हट्ट कशासाठी? कुणी तरी खांद्यावर बंदूक ठेवतात आणि बार उडवतात. अर्थात ते बार काही लागत नाही, अशी टीकाही राऊत यांनी केली. मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राणा दाम्पत्यासह भाजपवर निशाणा साधला.