Special Report | भाजपशी पुन्हा युती करणार? संजय राऊतांचं ठाकरेंसमोर सूचक विधान; म्हणाले,...तोपर्यंत मविआत राहू

Special Report | भाजपशी पुन्हा युती करणार? संजय राऊतांचं ठाकरेंसमोर सूचक विधान; म्हणाले,”…तोपर्यंत मविआत राहू”

| Updated on: Jun 19, 2023 | 8:09 AM

ठाकरे गटाचे रविवारी वरळीत राज्यव्यापी शिबिर पार पडले. या कार्यक्रमात बोलताना खासदार संजय राऊतांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. तसेत महाविकास आघाडीत आपली इच्छा असेपर्यंत राहू असं वक्तव्य केलं आहे.

मुंबई : ठाकरे गटाचे रविवारी वरळीत राज्यव्यापी शिबिर पार पडले. या कार्यक्रमात बोलताना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. तसेच महाविकास आघाडीत आपली इच्छा असेपर्यंत राहू असं वक्तव्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भावी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर्स आणि चर्चा होत आहे. त्यावरून संजय राऊत यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, “सध्या महाराष्ट्रामध्ये भावी मुख्यमंत्र्यांचं फार पीक आलं आहे. पाहावं तिकडं भावी मुख्यमंत्री. आपण मविआमध्ये आहोत. राहू. जोपर्यंत आपली इच्छा आहे तोपर्यंत. ते काही आमच्या इच्छेवर नाहीये, हे राजकारण आहे. पण आपण पाहतोय भावी मुख्यमंत्री, अरे बाबानो अजूनही विद्यमान मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) समोर बसलेले आहेत”. सजंय राऊत यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “संजय राऊत हेच मागे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमची आघाडी २५ वर्षे टिकणार असं म्हणायचे. तेव्हा त्यांना ती २५ वर्ष टिकावी वाटत असेल, आता त्यांनी पुढं आमचं एकट्याचं सरकार यावं असं वाटत असेल. त्यात चुकीचं काय?,” असं अजित पवार म्हणाले. संजय राऊत यांच्या या विधानानंतर ठाकरे गट मविआत राहणार की जुन्या युतीत सहभागी होणार यासाठी पाहा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jun 19, 2023 08:03 AM