संजय राऊत सलग दुसऱ्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर; ‘या’ आरोपांप्रकरणी जबाबाची नोंद
शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत सलग दुसऱ्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला आहे. पाहा...
नाशिक : शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत सलग दुसऱ्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर आहेत. सिन्नरमधील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने संजय राऊत नाशिकमध्ये आहेत. या दौऱ्यादरम्यान राजकीय गणितांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पक्षबांधणी आणि कार्यकर्त्यांशी संवाद यादृष्टीने संजय राऊत यांनी चर्चा केल्याची माहिती आहे. संजय राऊत यांच्या या दौऱ्यादरम्यान पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला आहे. संजय राऊत यांनी काल खासदार श्रीकांत शिंदेंवर जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप केला आहे.त्यानंतर आज ठाणे पोलिसांकडून आज जबाब नोंदवण्यात आला आहे. जवळपास तासभर त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. सात ते आठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाऱ्यांनी त्यांचा जबाब नोंदवला आहे.
Published on: Feb 22, 2023 12:30 PM
Latest Videos