Video : “पंकजा मुंडेंना एकटं पाडण्याचा डाव”, पाहा सविस्तर…
पंकजा मुंडे यांना एकटे पाडायचे असे भाजपचे धोरण दिसते, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपवर केली आहे. विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा डावलले. गोपीनाथ मुंडे (gopinath munde) व पंकजा मुंडे (pankaja munde) यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवाऱ्या द्यायच्या, असं राऊत यावेळी म्हणालेत. पुढे बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात स्वतःची […]
पंकजा मुंडे यांना एकटे पाडायचे असे भाजपचे धोरण दिसते, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपवर केली आहे. विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा डावलले. गोपीनाथ मुंडे (gopinath munde) व पंकजा मुंडे (pankaja munde) यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवाऱ्या द्यायच्या, असं राऊत यावेळी म्हणालेत. पुढे बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात स्वतःची फळी उभी करायची आहे व त्या फळीत जुन्या निष्ठावान भाजप पदाधिकाऱ्यांना स्थान दिसत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्षांतून आलेल्यांची मोट बांधली. त्यांना राज्यसभेपासून विधान परिषदेपर्यंत उमेदवाऱ्या सहज मिळाल्या. सदाभाऊ खोत, पडळकर, लाड, बोंडे यांना उमेदवारी मिळते, पण खडसे यांना पक्ष सोडावा लागतो व मुंडे यांना अपमानित करून डावलले जाते, अशी टीकाही राऊत यांनी केलीय.