मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सिंहासन लवकरच हलणार, संजय राऊत यांचा दावा

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सिंहासन लवकरच हलणार”, संजय राऊत यांचा दावा

| Updated on: Jun 02, 2023 | 12:05 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांना भेटायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जात असतील तर चुकीचं काय? राज्यात काही समस्या असेल आणि त्यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार हे मुख्यमंत्री शिंदे यांना भेटायला गेले असतील तर चुकीचं काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. मीडियाने सत्य समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ काढला तर अशा पद्धतीने कुणी कुणाकडे जायला नको. विधीमंडळात अनेक आमदार एकमेकांना भेटत असतात. त्यामुळे खळबळ माजते का? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एखादा नेता मुख्यमंत्र्यांना भेटला तर चुकीचं काय? आम्ही राज्यपालांना, मुख्यमंत्र्यांना निवेदन देत असतो. त्यांना भेटत असतो. त्यात चुकीचं काय? काही काळ का होईना मुख्यमंत्री सत्तेवर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना डिसमिस केलं. तरीही ते खुर्चीत आहेत. जोपर्यंत खुर्चीत आहेत तोपर्यंत त्यांच्याकडे निवेदनं दिली पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.