शिवरायांच्या अवमानावेळी शिंदेगट-भाजपचं तोंड गप्प का? संजय राऊत यांचा सवाल

शिवरायांच्या अवमानावेळी शिंदेगट-भाजपचं तोंड गप्प का? संजय राऊत यांचा सवाल

| Updated on: Jan 30, 2023 | 11:09 AM

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी भाजपला सल्लाही दिलाय. पाहा...

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. काल मुंबईत झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चावरून राऊतांनी भाजपवर टीका केलीय. शिवरायांच्या अवमानावेळी आम्ही आंदोलनं केली. त्या विधानांना कडाडून विरोध केला. तेव्हा शिंदेगट-भाजपचं तोंड गप्प का होतं?, असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. हिंदूंचा खरा आक्रोश बघायचा असेल तर भाजप नेत्यांनी काश्मीरमध्ये जावं. काश्मीरी पंडितांची अवस्था बघावी. वास्तव समोर येईल, असं राऊत म्हणालेत.