राज ठाकरे यांना पाहुणचाराची सवय, फडणवीस यांनी शिवतीर्थावर राहायला जावं, संजय राऊत यांचा टोला

“राज ठाकरे यांना पाहुणचाराची सवय, फडणवीस यांनी शिवतीर्थावर राहायला जावं”, संजय राऊत यांचा टोला

| Updated on: May 30, 2023 | 2:41 PM

"ठाकरे गट 19 खासदार परत निवडणून आणेल. तसेच शिंदे गटाच्या आमदारानंतर खासदारही अपात्र होणार", असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

नवी दिल्ली: “ठाकरे गट 19 खासदार परत निवडणून आणेल. तसेच शिंदे गटाच्या आमदारानंतर खासदारही अपात्र होणार”, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज ठाकरे यांना उत्तम पाहुणचाराची सवय आहे, फडणवीसांनी 8 दिवस राज ठाकरे यांच्या घरी राहून यावं, शिवतीर्थावर वॉकला जावं”, असं राऊत म्हणाले. तसेच “मोदी सरकारमध्ये नऊ वर्ष झाली. पण देशातला दहशतवाद संपवला की नाही हे मणिपूर मधील घटना ही ज्वलंत उदाहरण आहे. काश्मीरमध्ये आजही जवानांच्या सामुदायिक हत्या होत आहेत. आजही काश्मीरी पंडितांची घरवापसी होऊ शकलेली नाही. त्यांच्या हत्या सुरु आहेत. मणिपूरसारख्या ठिकाणी गेल्या एक महिन्यापासून हिंसाचार भडकला आहे, देशाचे गृहमंत्री आज तिथे पाय ठेवू शकत नाही, मग कोणता दहशतवाद कमी झाला?”, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

Published on: May 30, 2023 02:41 PM