बाळासाहेब देसाई लोकनेते, तर शंभूराज देसाई..., संजय राऊत यांचा हल्लाबोल

“बाळासाहेब देसाई लोकनेते, तर शंभूराज देसाई…”, संजय राऊत यांचा हल्लाबोल

| Updated on: Jun 26, 2023 | 12:29 PM

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या हस्ते पाटण मल्हार पेठ येथे विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला.उद्घाटनाला राऊत यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदमही उपस्थित होते. यावेळी भाषणात बोलताना संजय राऊत यांनी शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

सातारा: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या हस्ते पाटण मल्हार पेठ येथे विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. उद्घाटनाला राऊत यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदमही उपस्थित होते. यावेळी भाषणात बोलताना संजय राऊत यांनी शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. ते म्हणाले की, “महाराष्ट्राला बाळासाहेब देसाई यांची ओळख लोकनेते म्हणून होती आणि राहील. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांचा अत्यंत घरोबा होता. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब देसाई हे खंबीरपणे शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले होते. मात्र शंभूराज देसाई यांना लोकनेता होता येणार नाही. ते फेक नेते आहेत.” पुढे ते म्हणाले, “खोक्यांचा भूकंप झाला त्याचा केंद्रबिंदू पाटण आहे. 2024 ला सर्व हिशोब पूर्ण होईल. सुरत, गुवाहाटीनंतर आता नवीन देव शोधत आहेत.”

Published on: Jun 26, 2023 12:29 PM