महाराष्ट्रात भाडोत्री सैन्य राज्य करतंय, संजय राऊत यांचा शिंदे गटावर हल्लाबोल

“महाराष्ट्रात भाडोत्री सैन्य राज्य करतंय”, संजय राऊत यांचा शिंदे गटावर हल्लाबोल

| Updated on: Jun 25, 2023 | 2:57 PM

रशियामध्ये वॅगनर या भाडोत्री सैन्यामुळे उद्धभवलेल्या स्थितीवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. राज्यकर्ते ज्या पद्धतीने काम करत आहे, ही हुकूमशाही आणि दहशतवादाच्या पुढील पायरी आहे...

सातारा: रशियामध्ये वॅगनर या भाडोत्री सैन्यामुळे उद्धभवलेल्या स्थितीवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. “राज्यकर्ते ज्या पद्धतीने काम करत आहे, ही हुकूमशाही आणि दहशतवादाच्या पुढील पायरी आहे. पुतिन हा हुकूमशाह आहे. पुतिनने वॅगनर हे भाडोत्री सैन्य नेमलं होतं. जेव्हा भाडोत्री सैन्यावर राज्य करण्याची वेळ येते, तेव्हा ते उलटले जाते. जेव्हा भाडोत्री सैन्यावर राज्य करण्याची वेळ येते, तेव्हा ते उलटले जाते. महाराष्ट्रात भाडोत्री सैन्यच राज्य करत आहे. हे भाडोत्री सैन्यच तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. शिंदेंचं सैन्य हे भाडोत्री सैन्य आहे. ते भाडोत्री सैन्य भाजपावर उलटणार आहे. हे कोणाचे नसतात. हे बाजारबुणगे आहेत,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Published on: Jun 25, 2023 02:57 PM