“शिंदे यांच्या शिवसेनेला पक्ष बदलण्याची चटक”, संजय राऊत यांचा घणाघात
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर टीका केली आहे. गजानन कीर्तीकर हे शिवेसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनीच सांगितलं की भाजप सापत्न वागणूक देत आहे, खरं म्हणजे या आमदार-खासदारांनी हाच पाढा काँग्रेस-राष्ट्रवादीबाबतीत वाचला होता, आता भाजपबद्दल बोलत आहेत.
नवी दिल्ली: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर टीका केली आहे. गजानन कीर्तीकर हे शिवेसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनीच सांगितलं की भाजप सापत्न वागणूक देत आहे, खरं म्हणजे या आमदार-खासदारांनी हाच पाढा काँग्रेस-राष्ट्रवादीबाबतीत वाचला होता, आता भाजपबद्दल बोलत आहेत. मग आता तुम्ही कोणत्या पक्षात जाणार? कारण तुम्हाला पक्षांतराची चटक लागली आहे. तुमच्याकडे आता एक खंबीर नेतृत्व नाही जो भाजपशी लढू शकेल. तुमचे मुख्यमंत्री आणि तुमचे काही नेते हे भाजपसमोर गुडघे टेकून राज्य करत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच सर्वच पक्ष संपतील आणि भाजप एकच पक्ष राहिल, हे जे.पी नड्डा काय अमित शाहा ही म्हणाले आहेत. सर्व मित्र पक्षांना संपवायचं हे भाजपचं धोरण असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.