“हा गादीचा अपमान नाही का?”, संजय राऊत यांनी टोचले उदयनराजे-शिवेंद्रराजेंचे कान
खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा एक कार्यक्रम उदयनराजे भोसले यांनी उधळून लावला. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. या वादावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सातारा: खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा एक कार्यक्रम उदयनराजे भोसले यांनी उधळून लावला. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. या वादावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही जेव्हा एखादी टीका टिप्पणी करतो तेव्हा तो गादीचा अपमान ठरतो. तुम्ही रस्त्यावर एकमेकांचे वाभाडे काढता, तेव्हा तो गादीचा अपमान ठरत नाही का? तु्म्ही दोघेही छत्रपतींचे दोन वशंज, वारस आहात. आम्ही तुमच्याविषयी लोकशाही मार्गाने काही भाष्य केलं तर तो शिवरायांचा अपमान होतो, गादीचा अपमान होतो. हे तुम्हीच दोन राजे बोलत असता. पण तुम्ही दोन राजे साताऱ्याच्या रस्त्यावर येऊन भांडतात. तेव्हा आम्हालाही वाटते हा गादीचा अपमान होतो. दोन राजे ज्या पद्धतीने एकमेकांवर धावून जात आहेत.आता फक्त तलावारीच काढायचं बाकी आहे. हा गादीचा अपमान नाही का? आपण काय करत आहोत हे दोघांनी बसून ठरवलं पाहिजे,” असं संजय राऊत म्हणाले.