‘सौ सोनार की एक लोहार की’, अशी शिवसेनेची पत्रकार परिषद
शिवसेनेची (shivsena) आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. त्यापूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी सूचक इशारा दिला आहे.
मुंबई: शिवसेनेची (shivsena) आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. त्यापूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी सूचक इशारा दिला आहे. आज पत्रकार परिषद होणार आहे. मी स्वत:च जाहीर केलं आहे. त्यामुळे तुम्ही थोडी वाट पाहा. आमचीही पत्रकार परिषद पाहा. या, ऐका. कधी तरी शिवसेनेचं ऐका. सौ सोनार की एक लोहार की आज करणार आहोत, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. मात्र, दुपारी पत्रकार परिषदेत काय गौप्यस्फोट करणार यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. तसेच भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya)यांच्या आरोपावर विचारलं असता अरे सोड रे ते… असं म्हणत त्यांनी सोमय्यांच्या प्रश्नावर बोलण्यास टाळलं. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून राऊत हे अत्यंत गर्भित इशारे देत आहेत. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत ते काय पोलखोल करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे.
Published on: Feb 15, 2022 10:56 AM
Latest Videos