प्रदीप कुरुलकरवर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करत नाही?; संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल़

“प्रदीप कुरुलकरवर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करत नाही?”; संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल़

| Updated on: Aug 04, 2023 | 2:09 PM

डिआरडिओ संचालक आणि संघ स्वयंसेवक प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानी महिलेला देशाची अनेक संरक्षण विषयक गुपिते शेयर केली. मात्र अजूनही त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का केला जात नाही ? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई, 4 ऑगस्ट 2023 | डिआरडिओ संचालक आणि संघ स्वयंसेवक प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानी महिलेला देशाची अनेक संरक्षण विषयक गुपिते शेयर केली. मात्र अजूनही त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का केला जात नाही ? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते म्हणाले की, “संघ परिवाराचे महत्त्वाचे घटक असणारे, प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित असणारे आणि संघ विचाराची अशी व्यक्ती संरक्षण खात्यात बसून पाकिस्तानला मदत करत होती. हा संघ विचार आहे का? आणि जर नसेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल का केला नाही? नेहमी उठ,सुट अनेकांवर गुन्हे दाखल करतात .यासाठी एसआयटी स्थापन करतात, सीबीआयकडे पाठवतात, ईडीकडे पाठवतात, मग तुमच्या हातात आहे ना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे मग का करत नाही ? कोणाला वाचवत आहात या देशद्रोहांना?”

Published on: Aug 04, 2023 02:09 PM