Special Report | शिवसैनिकांच्या निशाण्यावर Kirit Somaiya

| Updated on: Apr 24, 2022 | 9:57 PM

कायदा सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न असेल तर शिष्टमंडळासह मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटलं पाहिजे ही परंपरा आहे. नंतर राष्ट्रपती, युनायटेड नेशनकडे जाऊ शकता. पण काही झालं तर दिल्लीत जाता. लोकशाही आणि राज्यातील शांतता धोक्यात आणण्यात अपरिपक्व विरोधी पक्ष जबाबदार आहे, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली आहे.

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी उद्या भाजपचे नेते दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहसचिवांकडे तक्रार करणार आहेत. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका केली आहे. आधी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे. कायदा सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न असेल तर शिष्टमंडळासह मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटलं पाहिजे ही परंपरा आहे. नंतर राष्ट्रपती, युनायटेड नेशनकडे जाऊ शकता. पण काही झालं तर दिल्लीत जाता. लोकशाही आणि राज्यातील शांतता धोक्यात आणण्यात अपरिपक्व विरोधी पक्ष जबाबदार आहे, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली आहे.