VIDEO : ‘अजित पवार यांच्या इच्छेवर दुसऱ्या पक्षांनी का रिअॅक्शन द्यावी?’, राऊत यांचा सवाल

VIDEO : ‘अजित पवार यांच्या इच्छेवर दुसऱ्या पक्षांनी का रिअॅक्शन द्यावी?’, राऊत यांचा सवाल

| Updated on: Jun 22, 2023 | 9:57 AM

त्यांनी आपली इच्छा व्यक्त करताना शरद पवार यांच्याकडे विनंती केली. त्यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करा. तर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी विषयी जबाबदारी अशी मागणी केली. त्यावरून आता राष्ट्रवादीसह इतर पक्षातूनही प्रतिक्रिया येत आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट बॉम्ब टाकला. तर त्यांनी आपली इच्छा व्यक्त करताना शरद पवार यांच्याकडे विनंती केली. त्यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करा. तर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी विषयी जबाबदारी अशी मागणी केली. त्यावरून आता राष्ट्रवादीसह इतर पक्षातूनही प्रतिक्रिया येत आहेत. याचदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची देखील यावर प्रतिक्रिया आली. त्यांनी, अजित पवार यांनी जरी आपली इच्छा व्यक्त केली असली तरी त्यावर काँग्रेस, शिवसेना किंवा अन्य पक्षाने का बरं भाष्य करावं असा प्रश्न केला आहे. तर यावर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच भाष्य करत नसतील तर बोलणं योग्य नाही. पण अजित पवार हे अत्यंत भावनिक आणि संवेदनशील व्यक्तिमत्व असल्याचं ते म्हणालेत.

Published on: Jun 22, 2023 09:57 AM