‘महाराष्ट्रात सध्या जी आग लागलीय ती उद्धवजींच्या…,’ काय म्हणाले संजय राऊत
पुणे येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या शिवसंकल्प मेळाव्यात विधानसभेच्या निवडणूकांचे रणशिंग फुंकले गेले. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित या मेळाव्यात आगामी विधानसभांची रणनिती ठरविण्यात आली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पुण्यात शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. संजय राऊत यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. संजय राऊत यांनी आपल्या भाषणात माझे पक्ष प्रमुख समोर बसले आहेत, आणि तुम्ही मला सांगताय जोरदार भाषण करा…म्हणजे साहेबांसमोर तुम्ही मला जोरदार भाषण ठोकायला सांगाताय…असे सांगत राऊत म्हणाले की उद्धव साहेब हसताय…परंतू या हसण्यामुळे राज्यात अनेकांना आग लागली आहे. जो काही राज्यात आज जळफळाट सुरु आहे. त्याला कारण उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावरील हे हास्यं आहे असे राऊत यांनी यावेळी सांगितले. यह हसता हुआ चेहराही कुछ लोगोंके जलने का कारण आहे. एवढं सगळं घडतंय संकटावर संकट येताहेत. कोंडी केली जातेय पण आमचा नेता मात्र हसत हसत सर्व संकटांना सामोरा जात आहे.आमचा नेता प्रत्येक संकटाचा सामना देतोय आणि आम्हाला लढण्याची प्रेरणा देतोय..पुण्यात आजचं वातावरण आपण पाहीले असेल खूप दिवसांनी पुण्यात असे वातावरण तयार झाले आहे. सुषमा अंधारे यांनी मगाशी भाषणात पुण्यात कोणत्या जागा लढवायच्या ते सांगितले. परंतू मी म्हणेन पुणे आणि मावळ जिल्ह्यातील प्रत्येक जागा लढण्याची शिवसेनेची ताकद आहे असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.